Amravati Graduate Election Result  Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Graduate Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का; मविआचे धीरज लिंगाडे विजयी

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati Graduate Election Result : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. धीरज लिंगाडे यांनी भाजपच्या रणजीत पाटील यांचा पराभव केला आहे. (Latest Marathi News)

अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी पूर्ण झाली आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले असून त्यांना 46344 मते मिळाली आहेत. तर भाजपचे रणजीत पाटील यांना 42962 मते मिळाली आहेत.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत ३३८२ मतांनी महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. दोन्ही उमेदवारांचा विजयाचा कोटा ४७ हजार १०१ पूर्ण झाला नाही. त्यामुळे धीरज लिंगाडे ४६३३० एवढी सर्वाधिक मते मिळाल्याने महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे 3382 मतांनी विजयी कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र बाहेर जल्लोष केला. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये धीरज लिंगाडे विजयी झाल्यानंतर त्यांच्या पत्नी पद्मजा लिंगाडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार रणजीत पाटील यांचा पराभव केलेला आहे. धीरज लिंगाडे यांना ऐन वेळेवर उमेदवारी जाहीर झाल्याने पाच जिल्ह्यांमध्ये फिरण्यासाठी वेळ अपुरा पडला मात्र त्यांच्या पत्नी पद्मजा यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत प्रचारामध्ये आघाडी घेतली होती', असे पद्मजा लिंगाडे म्हणाल्या.

'धीरज लिंगाडे विजय झाल्याची बातमी कळताच त्यांच्या पत्नी पद्मजा लिंगाडे या मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या. ज्या मतदारांनी विश्वासाने धीरज लिंगाडे यांना मतदान केले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असं पद्मजा लिंगाडे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT