Amravati Saam TV
महाराष्ट्र

Amravati: भरचौकात तरुणाने स्वत:लाच पेटवलं; अमरावतीमधील खळबळजनक घटना

Amravati Fire News: तरुणाने स्वतःला जाळून का घेतलं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. युवकाने स्वत:ला जाळून घेतले तेव्हा त्यावेळी रस्त्यावर अनेक जण उभे होते. यातील अनेकांनी ही थरारक घटना आपल्या फोनमध्ये कैद केली आहे.

Ruchika Jadhav

Amravati News:

अमरावतीच्या पंचवटी चौकात एका तरुणाने स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात तरुणाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेने या तरुणाचे प्राण वाचले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवताच स्थानिकांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले.

आगीमुळे तरुण 60 टक्के जळल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. प्रविण देशमुख (35 रा.लक्ष्मी नगर अमरावती) असं जाळून घेतलेल्या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरुणावर सध्या अमरावती जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

या तरुणाने स्वतःला जाळून का घेतलं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. युवकाने स्वत:ला जाळून घेतले तेव्हा त्यावेळी रस्त्यावर अनेक जण उभे होते. यातील अनेकांनी ही थरारक घटना आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. तसेच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे.

भर रस्त्यात स्वत:ला अशा पद्धतीने पेटवून घेणारा हा तरुण नेमका कोण आहे. आत्महत्या करण्यासाठी त्याला कोणी प्रवृत्त केले होते का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झालेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय. सदर तरुणाच्या नातेवाईकांची आणि परिसरातील अन्य व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT