Amravati Robbery News Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Robbery News : फिल्मीस्टाइल दरोडा! सोनाराला खाली पाडलं, अंदाजे दीड कोटींचं 800 ग्रॅम सोनं, लाखोंची कॅश लुटली

Amravati Robbery News : अमरावतीत फिल्मी स्टाईल दरोड्यात ७०० ते ८०० ग्रॅम सोने आणि १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. या घटनेचा पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अमरावतीतील कठोरा रोडवर फिल्मी स्टाईल दरोडा

  • ७००–८०० ग्रॅम सोने आणि १.७० लाखांची रोकड लंपास

  • चाकूचा धाक दाखवत आरोपींनी बॅग हिसकावली

  • गाडगे नगर पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास आणि आरोपींचा शोध सुरू

अमोल घाटरे, अमरावती

अमरावती शहरातील कठोरा रोड परिसरात काल रात्री फिल्मी स्टाईलने सोनारावर दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अंदाजे ७०० ते ८०० ग्रॅम सोने आणि १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. या घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत. तसेच या दरोड्यामुळे परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित्रा ज्वेलर्सचे संचालक सुशांत शेरेकर हे शुक्रवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता दुकान बंद करून घरी जात होते. दुकानापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या बालाजी नगर येथे त्यांचे वास्तव्य आहे. यावेळी काळ्या रंगाची चारचाकी गाडी त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या वाहनाला कट मारत त्यांना खाली पाडण्यात आले.

यानंतर गाडीतून उतरलेल्या ३ ते ४ आरोपींच्या टोळीने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील बॅग हिसकावून नेली.त्या बॅगेत अंदाजे ७०० ते ८०० ग्रॅम सोने तसेच १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम असल्याची माहिती आहे.

ही घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू आहे. आरोपींचा शोध सुरू असून या घटनेमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Magic Video : फोटोवर खिळा ठोकलेला, काळी बाहुली, हळद-कुंकू; व्हॅलेंटाइन डेला तरुणीवर जादूटोणा?

Maharashtra Live News Update : ठाकरे सेनेने विश्वासघात केला, वंचितच्या माजी शहरप्रमुखाचा गंभीर आरोप

Crime : पोलीस स्टेशनमध्ये राडा, बायको तक्रार करायला गेल्यावर पोलिसाची सटकली, मग..

Maharashtra Politics : संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत,भगवा कोणाचा फडकणार?

Shocking News : भाजप आमदाराच्या ऑफिसमध्ये पिस्तुल, घातपाताचा डाव? VIDEO

SCROLL FOR NEXT