महाराष्ट्र

Amravati Crime News: बस का थांबवली नाही? संतापलेल्या प्रवाशांकडून चालकाला मारहाण; अमरावतीमधील धक्कादायक घटना

Crime News: बसचा दोन ते तीन अज्ञात इसमांनी पाठलाग केला अन् बस थांबवली. बस चालकासोबत बस का थांबवली नाही म्हणून बाचाबाची सुरू केली. या दरम्यान त्यातीलच एका आरोपीने मागून

Ruchika Jadhav

अमर घटारे

Amravati:

दर्यापूर ते अमरावती मार्गावरील खोलापूर फाट्याजवळ दादागीरी आणि मारहाणीची एक घटना समोर आलीये. एका प्रवाशाने बस चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केलीये. सदर घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बस चालकाने खोलापूर फाट्याजवळ बस का थांबवली नाही? म्हणून पाठलाग करून बस चालकावर लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आलाय. यात बसचालक गंभीर जखमी झालेला आहे.

अकोट बस स्थानकाची बस क्रमांक एम एच 40 वाय 5714 चे चालक अमोल गावंडे (राहणार आकोट) येथून ते नागपूरला बस घेऊन जात असतात. खोलापूर फाट्याच्या आज इस्तेमा सुरू होता. त्या ठिकाणी 10 ते 15 लोकांनी बस थांबवण्यास सांगितले. मात्र त्या ठिकाणी बसस्टॉप नसल्यामुळे चालकाने बस थांबवली नाही.

त्यामुळे बसचा दोन ते तीन अज्ञात इसमांनी पाठलाग केला अन् बस थांबवली. बस चालकासोबत बस का थांबवली नाही म्हणून बाचाबाची सुरू केली. या दरम्यान त्यातीलच एका आरोपीने मागून येऊन बस चालकावर पाईपाने अचानक हल्ला केला. यात चालकाच्या चेहऱ्याला गंभीर जखम झाली.

त्यावेळी घटनास्थळी खोलापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर बस ही पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर चालकाच्या फिर्यादनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

Mumbai Shivaji Park : शिवाजी पार्कवर चिखलाचं साम्राज्य; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोर आव्हान | VIDEO

दुःखद! मुलाची आत्महत्या, १२ तासात बापानेही प्राण सोडले, धक्कादायक कारण चिठ्ठीतून उघड, बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरलं

Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT