Amravati Car Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Accident : मुलीचा वर्गात पहिला नंबर आला, सेलिब्रेशन करून परतताना काळाचा घाला; आई वडिलांसमोर पोटच्या लेकीचा मृत्यू

Amravati Car Accident News : अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेने कारला धडक दिल्याने ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून आई वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Alisha Khedekar

  • अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेची कारला धडक

  • ८ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

  • दोन जण गंभीर जखमी

  • अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर

अमर गटारे, अमरावती

Amravati Police Rahul Wankhede Car Accident News अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेने धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव चौफुलीवर पोलीस उपनिरीक्षकाच्या कारला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडल्याची घटना घडला. या भीषण अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक राहुल वानखडे हे आपल्या पत्नी आणि ८ वर्षीय मुलीसह, तळेगाव येथे खासगी चारचाकी वाहनाने जात होते. या दरम्यान देवगाव चौफुलीवर धामणगाव वरून यवतमाळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अँब्युलन्स वाहनने कारला जोरदार धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये पोलीस उप निरीक्षक राहुल वानखडे यांच्या कारचा चक्काचूर झाला. त्यामध्ये त्यांची ८ वर्षीय मुलगी त्रिशा राहुल वानखडे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वानखडे त्यांच्या पत्नी आणि ते स्वतः गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरु आहे. तसेच रुग्णवाहिकेमध्ये कोणताही रुग्ण नसताना चालक भरधाव वेगाने गाडी चालवीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. रुग्णवाहिका चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत मुलगी त्रिशा वानखडे ही धामणगाव रेल्वे येथील एस ओ एस शाळेत येथे तिसऱ्या वर्गात शिकत होती. तिचा वर्गात प्रथम क्रमांक आल्याने त्या आनंदात पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखडे हे आपल्या पत्नीसह शाळेत पेढे वाटण्याकरिता गेले होते. दरम्यान परत येत असताना देवगाव येथील पेट्रोलपंपवर पेट्रोल भरून परत तळेगाव दशासर येथे जातांना मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने वानखडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli : दुचाकीला २००, तर चारचाकीला २००० रुपयांचे पेट्रोल भरता येणार, कुठे लागू झाला आदेश?

Electricity Bill: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात कपात|VIDEO

अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ मोबाईलमधून पटकन डिलीट करा; आता शेअर करणाऱ्यांना थेट अटक होणार

Stylish Blouse: शालू पैठणी किंवा साध्या साडीवर ट्राय करा या ७ ट्रेंडी युनिक स्टायलिश डिझायनर ब्लाऊज

SCROLL FOR NEXT