Shruti Vilas Kadam
पॅन्ट किंवा प्लाझोच्या टोकाला लेस लावल्याने आउटफिटला एलिगंट आणि क्लासी लूक मिळतो. कुर्ती आणि शॉर्ट कुर्त्यासोबत हा डिझाइन सुंदर दिसतो.
मोत्यांची किंवा बीड्सची सजावट असलेली मोहरी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. पार्टीवेअर आणि फेस्टिव्ह लूकसाठी हा पर्याय आकर्षक ठरतो.
कटवर्क डिझाइन्समुळे साध्या प्लाझोलाही स्टायलिश लूक मिळतो. फ्लोरल किंवा जिओमेट्रिक कटवर्क विशेष लोकप्रिय आहे.
मोहऱ्यांवर केलेली रंगीत एम्ब्रॉयडरी आउटफिट अधिक रिच दिसायला मदत करते. पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा डिझाइन उत्तम मानला जातो.
फ्रिल डिटेलिंग असलेले प्लाझो आणि पॅन्ट्स सध्या युवतींमध्ये लोकप्रिय आहेत. यामुळे आउटफिटला मॉडर्न आणि ट्रेंडी लूक मिळतो.
साईड स्लिट किंवा फ्रंट स्लिट असलेली मोहरी फ्युजन फॅशनमध्ये खूप पसंत केली जाते. ही डिझाइन हील्ससोबत अधिक उठून दिसते.
राजस्थानी टच देणाऱ्या मिरर वर्क आणि गोटा पट्टी मोहऱ्या सण-समारंभासाठी उत्तम पर्याय आहेत. यामुळे साधं आउटफिटही आकर्षक दिसतं.