Shruti Vilas Kadam
पपईच्या पानांचा रस डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी झाल्यास उपयुक्त मानला जातो. यामुळे शरीरातील रक्तपेशी वाढण्यास मदत होऊ शकते.
या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराची इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.
पपईच्या पानांमध्ये पचनास मदत करणारे एन्झाइम्स असतात. त्यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
या रसातील दाहशामक गुणधर्म शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
पपईच्या पानांचा रस शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करू शकतो. त्यामुळे लिव्हर निरोगी राहण्यास मदत मिळते.
या रसातील जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवण्यास आणि केस मजबूत होण्यास मदत करतात.
ताजी पपईची पानं स्वच्छ धुऊन त्यांचा रस काढावा. हा रस कमी प्रमाणात पाण्यात मिसळून पिणं योग्य ठरतं. मात्र, कोणताही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.