Face Care: पिंपल्स कमी करुन नॅचरल सॉफ्ट चेहरा हवा असेल तर घरी तयार केलेला 'हा' फेसपॅक नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

फेसपॅक कसा तयार करावा?

दोन चमचे बेसनमध्ये तीन चमचे तांदळाचं पाणी मिसळा. हवे असल्यास त्यात चिमूटभर हळद किंवा गुलाबपाणीही घालू शकता.

Face Care | Saam Tv

त्वचा उजळवण्यास मदत

तांदळाच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि बेसनमधील नैसर्गिक गुण त्वचेवरील काळेपणा कमी करून चेहरा अधिक उजळ दिसण्यास मदत करतात.

Face Care | Saam tv

टॅनिंग कमी करण्यासाठी उपयुक्त

उन्हामुळे झालेली टॅनिंग कमी करण्यासाठी हा फेसपॅक फायदेशीर ठरतो. नियमित वापराने त्वचा स्वच्छ आणि फ्रेश दिसते.

face Care | Saam Tv

अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवते

बेसन त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करते, तर तांदळाचं पाणी त्वचेला संतुलित ठेवण्याचं काम करतं.

Face Care | Saam Tv

पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत

या मिश्रणातील नैसर्गिक गुणधर्म त्वचेवरील पिंपल्स, डाग आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Face Care | Saam Tv

त्वचेची सॉफ्ट एक्सफोलिएशन

बेसन त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतं. त्यामुळे त्वचा अधिक मऊ आणि स्वच्छ दिसते.

Face Care | Saam Tv

वापरण्याची योग्य पद्धत

तयार मिश्रण चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटं लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा वापरल्यास चांगला परिणाम दिसू शकतो.

Face Care | Saam tv

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टीन पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Pineapple Sheera Recipe | Saam Digital
येथे क्लिक करा