Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

१ कप रवा, १ कप बारीक चिरलेला पायनॅपल, ¾ कप साखर, तूप, काजू, बदाम, मनुका आणि पाणी लागेल.

Pineapple Sheera Recipe in marathi | yandex

रवा भाजून घ्या

कढईत तूप गरम करून रवा मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यामुळे शिऱ्याला छान सुगंध येतो.

Pineapple Sheera Recipe

पायनॅपल शिजवा

वेगळ्या पॅनमध्ये थोड्या तुपात पायनॅपलचे तुकडे हलके परतून घ्या. त्यामुळे त्यातील कच्चेपणा कमी होतो.

Pineapple Sheera Recipe | Saam TV

पाणी आणि साखर मिसळा

भाजलेल्या रव्यामध्ये गरम पाणी घाला आणि चांगले हलवा. त्यानंतर साखर आणि शिजवलेला पायनॅपल घालून मिश्रण एकजीव करा.

Pineapple Sheera | canva

ड्रायफ्रूट्स घाला

काजू, बदाम आणि मनुका तुपात भाजून शिऱ्यात मिसळा. त्यामुळे चव अधिक वाढते.

Pineapple Sheera Recipe | Saam tv

सुगंधासाठी वेलची वापरा

थोडी वेलची पावडर घातल्यास शिऱ्याला छान सुगंध आणि स्वाद मिळतो.

Pineapple Sheera Recipe | yandex

गरमागरम सर्व्ह करा

तयार पायनॅपल शिरा गरमागरम सर्व्ह करा. नाश्ता, सण किंवा खास प्रसंगी ही स्वीट डिश उत्तम पर्याय ठरते.

Pineapple Sheera Recipe

Moong Dal Chilla Recipe: सकाळी करा नाश्ता हेल्दी, झटपट बनवा टेस्टी मूग डाळ चिल्ला, वाचा रेसिपी

Moong Dal Chilla | Freepik
येथे क्लिक करा