Shruti Vilas Kadam
१ कप पिवळी मूग डाळ, १ कांदा, १ हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, मीठ आणि थोडंसं तेल लागेल. हवे असल्यास किसलेले गाजरही घालू शकता.
मूग डाळ ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे डाळ मऊ होते आणि बॅटर छान तयार होते.
भिजवलेली डाळ, आलं आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात मीठ, कांदा आणि कोथिंबीर मिसळा.
नॉनस्टिक किंवा लोखंडी तवा गरम करून त्यावर हलके तेल लावा. त्यामुळे चिल्ला चिकटत नाही.
तव्यावर एक डाव बॅटर टाकून गोल आकारात पसरवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा.
मूग डाळ चिल्ला प्रोटीन आणि फायबरने भरपूर असतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पोट भरलेलं राहण्यासाठी मदत होते.
गरमागरम मूग डाळ चिल्ला हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत खायला अधिक स्वादिष्ट लागतो.