Hair Care: केसगळती कमी करायची आहे? मग 'हे' घरी बनवलेलं हेअर वॉटर अंघोळी केल्यानंतर १ स्प्रे करा

Shruti Vilas Kadam

केसांची वाढ जलद होण्यास मदत

जास्वंद आणि रोजमेरी वॉटर स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळून केसांची वाढ चांगली होते.

Hair Care:

केसगळती कमी करण्यास फायदेशीर

रोजमेरीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, तर जास्वंद केसांना मजबुती देते. त्यामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होऊ शकते.

Hair Care | Saam Tv

कोंडा कमी करण्यास मदत

या मिश्रणातील नैसर्गिक गुणधर्म स्काल्प स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कोंडा आणि खाज कमी होण्यास मदत मिळते.

Hair Care

केसांना नैसर्गिक चमक मिळते

जास्वंद केस मऊ आणि सिल्की बनवण्यास मदत करते. नियमित वापरामुळे केस अधिक चमकदार दिसू शकतात.

Hair Care

हेअर वॉटर कसे तयार करावे?

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात जास्वंदाची फुले आणि रोजमेरी पाने उकळा. पाणी थंड झाल्यावर गाळून स्प्रे बाटलीत भरून ठेवा.

Hair Care

वापरण्याची योग्य पद्धत

हे तयार वॉटर केसांच्या मुळांवर आणि स्काल्पवर स्प्रे करा. हलक्या हाताने मसाज करून ३० मिनिटांनी केस धुवावेत.

Hair Care | Saam Tv

आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरा

नियमित वापरामुळे केस अधिक मजबूत, घनदाट आणि निरोगी दिसण्यास मदत होऊ शकते.

Hair Care | Saam tv

Face Care: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणि सॉफ्टनेस पाहिजे? मग घर बनवलेला हा फेसमास्क नक्की लावा

Face Care | Saam tv
येथे क्लिक करा