Shruti Vilas Kadam
एका भांड्यात १ चमचा चंदन पावडर, २ चमचे बेसन आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
चंदन, बेसन आणि गुलाबपाणी एकत्र वापरल्याने त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते. नियमित वापरामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
उन्हामुळे झालेली टॅनिंग कमी करण्यासाठी हा फेसपॅक फायदेशीर ठरतो. बेसन त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते.
गुलाबपाणी त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे चेहरा फ्रेश आणि कमी चिकट वाटतो.
चंदनामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते आणि पिंपल्स कमी होण्यास मदत मिळू शकते.
तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. १५ ते २० मिनिटांनी सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
हा फेसपॅक आठवड्यातून २ वेळा वापरल्यास त्वचा स्वच्छ, मऊ आणि ताजीतवानी दिसण्यास मदत होऊ शकते.