Shruti Vilas Kadam
कॉटन हे उन्हाळ्यासाठी सर्वात आरामदायक कापड मानले जाते. हे घाम शोषून घेत असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
हलके आणि फ्लोई असलेले शिफॉन कपडे समर वेडिंगमध्ये एलिगंट लुक देतात. साड्या आणि ड्रेससाठी हा उत्तम पर्याय आहे.
जॉर्जेट कापड हलके आणि स्टायलिश दिसते. यामुळे outfit ला सुंदर fall मिळतो आणि उकाड्यातही कम्फर्टेबल वाटते.
लिनेन breathable असल्यामुळे गरम हवेत खूप आरामदायक वाटते. साधा पण classy लुक हवा असल्यास हा पर्याय चांगला आहे.
हलके आणि ट्रेंडी दिसणारे ऑर्गेन्झा सध्या खूप फॅशनमध्ये आहे. समर वेडिंगसाठी याचे लेहंगे आणि साड्या लोकप्रिय आहेत.
रेयॉन मऊ आणि हलके असल्यामुळे ते त्वचेला आरामदायक वाटते. कुर्ती, गाऊन आणि सूटसाठी हे कापड चांगले मानले जाते.
उन्हाळ्याच्या हंगामासाठी चिकनकारी सूट्स ही सर्वोत्तम निवड आहे. हलका कपडा आणि नक्षीदार भरतकाम त्यांना अत्यंत राजस आणि आकर्षक रूप प्रदान करते.