Shruti Vilas Kadam
हा सर्वात लोकप्रिय प्रकार मानला जातो. पावडर आणि लिक्विडच्या मिश्रणातून तयार केलेले अॅक्रिलिक नखांवर लावले जाते. हे मजबूत आणि टिकाऊ असतात. यासाठी साधारण 1,500 ते 4,000 पर्यंत खर्च येऊ शकतो.
Gel आधारित एक्स्टेन्शन नैसर्गिक आणि चमकदार दिसतात. UV किंवा LED लाईटच्या मदतीने हे सेट केले जाते. हलक्या आणि ग्लॉसी लुकसाठी हा पर्याय उत्तम आहे. याची किंमत साधारण 2,000 ते 5,000 पर्यंत असते.
या प्रकारात फायबरग्लासच्या पातळ पट्ट्यांचा वापर केला जातो. नखे कमकुवत असतील तर हा प्रकार चांगला मानला जातो. यासाठी अंदाजे 2,500 ते 4,500 खर्च लागू शकतो.
Acrylic आणि Gel यांचे मिश्रण म्हणजे Polygel. हे हलके, टिकाऊ आणि सहज आकार देता येणारे असल्यामुळे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. याची किंमत साधारण 2,000 ते 5,500 पर्यंत असू शकते.
तयार कृत्रिम नखे गोंदाच्या मदतीने चिकटवली जातात. कमी वेळात स्टायलिश लुक हवा असल्यास हा पर्याय सोयीस्कर ठरतो. बाजारात 300 ते 1,500 दरम्यान विविध डिझाईन्स उपलब्ध असतात.
या प्रकारात Silk material वापरून नखे मजबूत केली जातात. नैसर्गिक नखांचे संरक्षण करण्यासाठी हा पर्याय वापरला जातो. हे एक्सटेंशन साधारण 1,500 ते 3,500 पर्यंत मिळू शकतो.
नखांना विशेष पावडरमध्ये डिप करून हा प्रकार तयार केला जातो. हे नखे मजबूत ठेवण्यासोबतच दीर्घकाळ टिकतात. यासाठी अंदाजे 2,000 ते 4,500 खर्च येऊ शकतो.