Shruti Vilas Kadam
सूर्यनमस्कारामध्ये १२ योगासनांचा समावेश असतो. त्यामुळे हात, पाय, पाठ, पोट आणि खांद्यांसह संपूर्ण शरीरातील स्नायूंना व्यायाम मिळतो.
साधारण १० ते १२ सूर्यनमस्कार केल्यास ८० ते १४० कॅलरीपर्यंत बर्न होऊ शकतात. व्यायामाची गती आणि व्यक्तीच्या वजनानुसार हा आकडा बदलू शकतो.
सूर्यनमस्कार नियमित आणि वेगाने केल्यास शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो. त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते.
दररोज २० ते ३० मिनिटे सूर्यनमस्कार केल्यास बेली फॅट कमी होण्यास मदत होते. शरीर अधिक फिट आणि टोन दिसू लागते.
सूर्यनमस्कारामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.
हा योग प्रकार मानसिक शांतता देतो. तणाव कमी झाल्यामुळे भावनिक खाण्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
फक्त सूर्यनमस्कार करून चालत नाही. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांचा समतोल राखणे आवश्यक आहे.