Shreya Maskar
पनवेल जवळ थंड हवेची सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही जर मे महिन्यात गावी गेला नसाल तर या ठिकाणांना वीकेंडला नक्की भेट द्या.
माथेरान आशियातील एकमेव वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे अनेक सुंदर व्ह्यू पॉइंट्स आहेत. सूर्यास्ताचा नजारा पाहून डोळे दिपतील. येथे आल्हाददायक हवामान पाहायला मिळते.
कर्जत येथे तुम्ही रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच येथे राहण्याची-खाण्यापिण्याची उत्तम स्पॉट आहेत. तसेच तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.
लोणावळा हिरव्यागार सह्याद्रीच्या टेकड्या, धुक्याने आच्छादलेली पावसाळ्यातील निसर्गदृश्ये आणि धबधब्यांमुळे 'वीकेंड गेटअवे' साठी बेस्ट आहे. लोणावळ्याला गेल्यावर चिक्की नक्की खा.
खंडाळा विशेषतः पावसाळ्यात पश्चिम घाटाच्या मनमोहक, धुक्याने वेढलेल्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिरवीगार वनराई, नयनरम्य दऱ्या, रमणीय स्थळे आणि प्राचीन, ऐतिहासिक, खडकात कोरलेल्या गुहा येथे पाहायला मिळतात.
माळशेज घाट हंगामी धबधबे, धुक्याने आच्छादलेले डोंगर आणि हिरवीगार निसर्गशोभा यासाठी ओळखला जातो. निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि पक्षीनिरीक्षकांमध्ये हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे. येथे सुंदर पक्षी पाहायला मिळतात.
दुर्शेत कुंडलिका नदीवरील 'रिव्हर राफ्टिंग'साठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तसेच तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.