Shreya Maskar
बोर्डी बीच हा पालघर जिल्ह्यात डहाणूजवळ असलेला एक शांत, उथळ समुद्रकिनारा आहे. तो मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. तसेच गुजरातच्या सीमेजवळ आहे.
बोर्डी बीच त्याच्या काळ्या-पांढऱ्या वाळूसाठी, नारळ-पोफळीच्या बागा आणि खास करून चिकूच्या बागांसाठी ओळखला जातो. येथे वीकेंडला तुम्ही तुफान मजा-मस्ती करू शकता.
बोर्डी येथे होणारा वार्षिक चिकू महोत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चिकू महोत्सवात चिकू बर्फी, वेफर्स आणि चॉकलेट्ससह अनेक उत्पादने प्रदर्शित केली जातात.
बोर्डीला 'चिकूची भूमी' म्हणून ओळखले जाते. बोर्डी बीचवर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता.
बोर्डी समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर बोटिंग (नौकाविहार) सुविधा उपलब्ध आहे.
तुमच्या मुलांना घोडेस्वारी आणि उंट सफारी करायची असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. समुद्रकिनाऱ्यावर घोड्यावरून आणि उंटावरून फिरण्याचा आनंद खूपच वेगळा आहे.
पालघरमध्ये अनेक फिरण्याची ठिकाणे आहेत. उदा. अर्नाळा बीच, दाहाणू-बोर्डी बीच, शिरगाव किल्ला, जव्हार हिल स्टेशन, कलमांडवी धबधबा, जीवदानी मंदिर
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.