Amravati Agricultural Exhibition 2023 Saamtv
महाराष्ट्र

Amravati News : अबब! किंमत ५१ लाख, ११०० किलो वजन; 'सुलतान'चा स्वॅग भारी, दररोजचा आहार भन्नाट

Amravati News: कृषिरत्न डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात तब्बल ५१ लाख किमतीच्या सुलतान रेड्याने अमरावतीकरांचे लक्ष वेधले आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. ३० डिसेंबर २०२३

Amravati Agricultural Exhibition 2023:

कृषिरत्न डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २७ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात विविध पिके, पशू प्रदर्शन, पुष्प प्रदर्शन तसेच कृषी क्षेत्रातील अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. या सर्वांमध्ये तब्बल ५१ लाख किमतीच्या सुलतान रेड्याने अमरावतीकरांचे लक्ष वेधले आहे.

अमरावतीत (Amravati) कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरलेला ‘सुलतान’ रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सुलतान मुऱ्हा जातीचा रेडा असून त्याची किंमत तब्बल ५१ लाख एवढी आहे.

एका आलिशान फ्लॅटपेक्षाही महाग असलेल्या या सुलतानची किंमत ऐकून सर्वच जण थक्क होत आहेत. महाराष्ट्र शासन आयोजित 'महा पशुधन एक्स्पो २०२३' मध्ये सुलतानचा देशात द्वितीय क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. सुलतानची जशी किंमत अन् दरारा आहे, तसाच त्याचा खुराकही जबरदस्त आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुलतानचे मालक पोपट श्रीधर गिरवले यांनी त्याच्या खुराकाबद्दल माहिती दिली. श्री पोपट गिरवले म्हणाले की, सुलतानचे वय ५ वर्ष ३ महिने आणि वजन ११०० किलो आहे. त्याला दररोज ५ किलो शेंगदाणा पेंड, १० लिटर दूध, अंडे, हिरवा चारा, उस, घास, मका असा रतीब लागतो. तसेच मुरराहा मादी ही दिवसाला २७ लिटर दूध देते. दरम्यान, फॉर्च्युनरपेक्षाही महाग असलेल्या या सुलतानला पाहण्यासाठी अमरावतीकर मोठी गर्दी करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT