Amravati Accident News Saam TV
महाराष्ट्र

Amravati Accident News: ट्रक अन् दुचाकीचा भीषण अपघात; पायावर चाक आल्याने महिला पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Amravati Accident News: प्रियंका कोठेवार सकाळी आपल्या दुचाकीने आपल्या राजापेठ पोलीस स्टेशनं येथे ड्युटीला जात होत्या.

Ruchika Jadhav

अमर घटारे

Amravati Accident:

अमरावतीत एक थरारकर अपघाताची घटना घडली आहे. एका महिला पोलीस अधिकारीला भरधाव ट्रकने चिरडलंय. अमरावतीच्या बियाणी चौकात रेतीचा ट्रक आणि दुचाकीचा अपघात झालाय. या अपघातात सहाय्यक पोलीस अधिकारी प्रियंका कोठेवार यांचा पाय निकामी झाला आहे

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी सकाळी कॅम्प येथील बियाणी चौकात ट्रक आणि दुचाकी वाहनात भीषण अपघात घडला. या अपघातात ए पी आय प्रियंका कोठेवार राजापेठ पोलीस स्टेशन (वय ३८) राहणार तपोवान या गंभीर जखमी झाल्या. प्रियंका कोठेवार सकाळी आपल्या दुचाकीने आपल्या राजापेठ पोलीस स्टेशनं येथे ड्युटीला जात होत्या.

यावेळी एका ट्रकच्या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. ट्रक आणि दुचाकी तपोवन मार्गाने बियाणी चौक मार्गाने येत होते. अशातच ट्रक चपराशी पुरा मार्गावर वळण घेत असताना दुचाकीला धडक बसून कोठेवार यांच्या पायावर चाक आल्याने पायाला गंभीर इजा झालीये.

अपघात घडला तेव्हा कोठेवार यांच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. यावेळी नागरिकांनी धाव घेतली पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी कोठेवार यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी धाव घेऊन ट्रक चालकाला ताब्यात घेतले. तर अपघात स्थळ बियाणी चौकात पंचनामा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

Papad Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? मग कुरकुरीत पापडापासून बनवा 'हा' पदार्थ

Friday Horoscope: शुक्रवारची सुरुवात धमाकेदार बातमीने होईल, हाती आलेला पैसा जाण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: कन्नडला टोमॅटो दोन रुपये किलो व्यापाऱ्यांकडून लूट

Heart Disease: कमी झोपेमुळे तुम्हीच देताय हार्ट अटॅकला आमंत्रण, ह्रदयाचे आणि झोपेचे नाते काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT