Amravati Accident News Saam TV
महाराष्ट्र

Amravati News : कॉलेजला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली, परतलीच नाही; तरुणीसोबत घडली भयंकर घटना

Amravati Accident News : कॉलेजला जात असल्याचे हसत खेळत तरुणी घराबाहेर पडली. मात्र, वाटेतच तिला मृत्युने कवटाळलं.

साम टिव्ही ब्युरो

Amravati Accident News : कॉलेजला जात असल्याचे हसत खेळत तरुणी घराबाहेर पडली. मात्र, वाटेतच तिला मृत्युने कवटाळलं. विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की टिप्परखाली आल्याने महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

ही दुर्दैवी घटना (Amravati) सकाळी शुक्रवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास हरवतखेडा ते परतवाडा मार्गावर घडली. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतीक्षा राजेंद्र गावंडे (वय- २३ रा. हनवतखेडा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

प्रतीक्षा ही परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात एम. कॉम. ला शिकत होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे दुचाकी क्रमांक एमएच २७ एटी ०५९५ ने घरून महाविद्यालयात जायला निघाली. मार्गात टिप्पर क्रमांक एमएच २७ एक्स ६८५६ ने काळ बनून तिला चिरडलं.

प्रतीक्षा ही कॉलेजला जात असताना, मुरूम घेऊन जात असलेल्या टिप्परने दिला धडक (Accident) दिली. तिचे संतुलन बिघडल्याने ती ट्रकच्या समोरील चाकात आली. तिच्या मानेवरून ट्रकचे चाके गेल्याने ती जागीच गतप्राण झाली. घडलेल्या घटनेची माहिती गावात पसरतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सदर टिप्पर जाळण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत ट्रिप्पर चालक घटनास्थळ सोडून पळून गेला होता.

सदर रस्त्याला लागून असलेल्या झाडा झुडपामुळे वाहन चालकांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा आहे. गावातून अरुंद असलेल्या रस्त्याने जड वाहने चोरूनलपून गौण खनिजाची वाहतूक करतात. त्यामुळे असे अपघात होत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. परतवाडा पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sooryavansham : 'सूर्यवंशम' मधील हीरा ठाकुरचा मुलगा आता कसा दिसतोय? इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव, पाहा फोटो

Gas Shortage: गॅस सिलिंडरसाठी राज्य सरकारची नवी नियमाली; फडणवीस सरकारनं नेमका काय घेतला निर्णय?

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

LPG Cylinder Price: तुमच्या शहरात LPG गॅस सिलिंडरची किंमत किती? बुकिंग करण्याआधी दर जाणून घ्याच

Accident News : ४० हून अधिक प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ३० जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT