Amravati Accident Saam tv
महाराष्ट्र

Amravati Accident : पेट्रोलने भरलेल्या ट्रॅकरने महिलेला चिरडले; महिलेचा जागीच मृत्यू

Amravati News : अमरावती शहरातील इर्विन चौक ते राजकमल चौकापर्यंत असलेल्या उड्डाण पुलावर अपघात झाला असून या अपघातात वर्षा खाळंगे असे मृत महिलेचे नाव असून अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरातील रहिवासी

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती शहरातून गेलेल्या उड्डाण पुलावर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यात पेट्रोलने भरलेल्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक देत उडविले. यात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर उड्डाण पुलावर वाहतूक काही वेळी खोळंबली होती. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. 

अमरावती शहरातील इर्विन चौक ते राजकमल चौकापर्यंत असलेल्या उड्डाण पुलावर हा अपघात झाला असून या अपघातात वर्षा खाळंगे असे या मृत महिलेचे नाव असून अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरातील रहिवासी आहे. दरम्यान महिला स्कुटीने जात असताना पेट्रोलने भरलेल्या ट्रॅकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत महिला खाली पडल्यानंतर ट्रॅकरच्या चाकाखाली सापडल्या. 

कुटुंबीयांचा आक्रोश 
ट्रॅकरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला असून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅकर ताब्यात घेतला असून सिटी कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत. 

सिग्नलला थांबलेल्या ४ ते ५ गाड्यांना बसची धडक

पिंपरी चिंचवड : शहरातील नाशिक फाटा रोडवर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने सिग्नलला थांबलेल्या ४ ते ५ चारचाकी वाहनांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अपघातानंतर काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. मात्र चार चाकी वाहनांचा मोठे नुकसान झालं आहे. भोसरी पोलिसांनी एसटी बस चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT