Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'एक रिक्त मंत्रिपद जयंत पाटलांसाठीच'; अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, चर्चांना उधाण

Maharashtra Political News : मंत्रिमंडळ विस्तारानंतर 1 मंत्रिपद रिक्त आहे... तर हे मंत्रिपद जयंत पाटलांसाठी रिक्त ठेवल्याची चर्चा रंगली असतानाच अजित पवारांच्या पक्षातून मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय... त्यामुळे जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार का? याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला....त्यात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदं देण्यात आलेत.. मात्र मंत्रिमंडळात एक जागा रिक्त ठेवण्यात आलीय.. ही जागा जयंत पाटलांसाठी ठेवण्यात आल्याची चर्चा रंगलीय. तर जयंत पाटलांसाठीच एक जागा राखीव ठेवण्यात आल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांच्या पक्षाकडून करण्यात आलाय...तर त्यासाठी जयंत पाटलांनी विशेष अधिवेशनात केलेल्या योग्य वेळी योग्य निर्णय, या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आलाय...

नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात भाजपला 19, शिंदे गटाला 11 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 42 मंत्र्यांनी शपथ घेतल्याने 43 पैकी 42 मंत्री बनलेत...रिक्त असलेल्या जागेवर जयंत पाटलांची वर्णी लावण्यात येणार असल्यानं ते डिसेंबर अखेरपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचं मिटकरींनी म्हटलंय.,....जयंत पाटील पवारांची राष्ट्रवादी का सोडू शकतात ते पाहूयात...

जयंत पाटील अजितदादांसोबत जाणार का?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाचं घटलेलं संख्याबळ

रोहित पवारांशी असलेले पक्षांतर्गत मतभेद

विरोधी पक्षात राहिल्यास निधीबाबत अडचणी येण्याची शक्यता

आय एल अँड एफ एस कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची टांगती तलवार

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चा वारंवार रंगल्या आहेत.. त्यातच विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अजित पवारांनी जयंत पाटलांची वाट बघत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याला योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाईनचा संदर्भ देत जयंत पाटलांनी सूचक विधान केलं होतं. मात्र आता मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असल्याने जयंत पाटील पवारांची साथ सोडून घड्याळ हाती बांधणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

SCROLL FOR NEXT