Amol Mitkari latest news : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी आज निवडणुकीची घोषणा झाली. उद्धव ठाकरेंपासून ते अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे, निलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे. त्याआधी नवीन सदस्यांची निवड होणार आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी मिळणार का? अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फक्त एकच जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छूक खूप आहेत. पण संधी कुणाला मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Maharashtra MLC Elections 2026: Will Amol Mitkari Get Another Chance? NCP Seat Share Explained)
विधानसभेतील संख्याबळानुसार विधान परिषदेच्या ९ जागापैकी भाजपच्या वाट्याला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येऊ शकते. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मतं आहेत, अशात महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर मैदानात उतरणार की २ याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. अमोल मिटकरींसह अनेकजण आमदारकीसाठी इच्छूक असतील, पण पक्षाकडून कुणाला तिकीट दिले जाईल, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
अमोल मिटकरी यांचा विधान परिषदेचा (MLAs द्वारे निवडून आलेले) सध्याचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. मिटकरी हे अजित पवार गटाचे अत्यंत आक्रमक प्रवक्ते मानले जातात. आगामी निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी मिळते की नाही, हे राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जागावाटपावर अवलंबून असेल. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार, महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात या जागांचे वाटप होईल. राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) सध्या ४० पेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ असल्याने, त्यांना या ९ पैकी किमान १ ते २ जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक असतीलच. पण याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेते घेतील. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पक्षाने मला पुन्हा संधी दिली, तर त्याचे सोनं करेल आणि अजित पवार यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न करेल. मात्र संधी मिळाली नाही तर कोणतीही नाराजी राहणार नाही. पक्षाने आणि वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पार पाडणार.- अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
विधान परिषद निवडणूक वेळापत्रक :
अधिसूचना जारी करणे: २३ एप्रिल २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख: ३० एप्रिल २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्जांची छाननी: २ मे २०२६ (शनिवार)
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ४ मे २०२६ (सोमवार)
मतदानाचा दिनांक: १२ मे २०२६ (मंगळवार)
मतदानाची वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत
मतमोजणी: १२ मे २०२६ (मंगळवार) सायंकाळी ५:०० वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख: १३ मे २०२६ (बुधवार)
कार्यकाळ संपणारे ९ सदस्य कोणते?
संजय किशनराव केणेकर
नीलम दिवाकर गोऱ्हे
उद्धव बाळासाहेब ठाकरे
संदीप दिवाकर जोशी
दादाराव यादवराव केचे
अमोल रामकृष्ण मिटकरी
रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील
राजेश धोंडीराम राठोड
शशिकांत जयवंतराव शिंदे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.