bacchu kadu amol mitkari 
महाराष्ट्र

पराभवानंतर मिटकरींचा कडूंवर प्रहार; 'महाविकास'ने एकसंध राहावे

जयेश गावंडे

अकाेला : ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका महत्वाच्या असतात हे त्यांनी समजून घेतले पाहिजे असे आमदार अमाेल मिटकरी यांनी अकाेला जिल्हा परिषदेच्या पाेटनिवडणुकीत कुटासा सर्कल येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पराभवानंतर नमूद केले. भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकासने एकसंध राहणे आवश्यक असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपने प्रहार जनशक्ती पार्टीला मदत केल्याने त्यांचा उमेदवारास विजय मिळविता आला असे मिटकरींनी दावा केला. दरम्यान अकाेला जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सर्वांत जास्त जागा मिळाल्या आहेत. amol-mitkari-bacchu-kadu-akola-zilla-parishad-election-result-sml80

वंचित बहुजन आघाडीस सहा, राष्ट्रवादी काॅंग्रेसला दाेन, शिवसेनेसह, भाजप, प्रहार आणि काॅंग्रेस पक्षास प्रत्येकी एक जागा व अपक्ष उमेदवारांनी दाेन जागा जिंकल्या. दरम्यान अकोल्यातील कुटासा जिल्हा परिषदेची जागा निवडून आणण्यासाठी भाजपने प्रहारला मदत केल्याचा दावा आमदार अमाेल मिटकरी यांनी केला आहे. या दगा फटक्यामुळे महाविकास आघाडीचा ताेटा झाल्याचे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास सत्ता येऊ शकते. राष्ट्रवादी २६५० मते मिळाली आहेत. भाजपच्या आत्ताच्या सदस्य या उमेदवार हाेत्या. तरी देखील त्यांना आमच्या पक्षापेक्षा कमी मते मिळाली आहेत. तेथे भाजपपेक्षा आमचा पक्षाची कामगिरी चांगली झालेली आहे. प्रहारच्या उमेदवारास भाजपची मदत झाल्याने त्यांचा उमेदवार विजय झाला. राष्ट्रवादीने एक जागा जादा पटकाविली आहे. भाजप आणि वंचित बहजुन आघाडीने दाेन जागा गमवल्या. काॅंग्रेस आहे तेथेच आहे. काॅंग्रेस साेबत असते तर आम्ही (महाविकास आघाडी) वंचितचे प्राबल्य थांबवले असते. ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका महत्वाच्या असतात हे समजून घेतले पाहिजे असेही मिटकरी यांनी नमूद केले. भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकासने एकसंध राहणे आवश्यक असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पन्नास हजार मताच्या फरकाने निवडून येणार-माधुरी मिसाळ

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

SCROLL FOR NEXT