

Summary -
राजनाथ सिंह यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत धक्कादायक दावा केला
नेहरूंना पब्लिक फंड वापरून बाबरी मशीद बांधायची होती असे ते म्हणाले
सरदार पटेल यांनी नेहरूंच्या अनेक प्रस्तावांना विरोध केल्याचा दावा त्यांनी केला
सोमनाथ मंदिर आणि राम मंदिर पूर्णपणे जनतेच्या देणगीने उभारले गेल्याचे ते म्हणाले
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बाबरी मशिदीचा उल्लेख करत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत खळबळजनक दावा केला. 'देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पब्लिक फंडचा वापर करून बाबरी मशीद बांधायची होती.' गुजरातमधील वडोदरा येथील साधली गावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना राजनाथ सिंह यांनी बाबरी मशिदीबाबत हे मोठं विधान केले.
राजनाथ सिंह यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. ते म्हणाले की, 'सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरूंच्या योजना यशस्वी होण्यापासून रोखल्या.' सरदार वल्लभभाई पटेल हे खरे उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व होते जे तुष्टीकरणावर विश्वास ठेवत नव्हते.', असे म्हणत राजनाथ सिंह यांनी वल्लभभाई पटेल यांचे कौतुक केले.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, 'जर कोणी नेहरूंच्या प्रस्तावाला विरोध केला असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल होते. जे गुजराती आईच्या पोटी जन्मला आले होते. जेव्हा नेहरूंनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा वल्लभभाई पटेलांनी स्पष्ट केले होते की मंदिर हा एक वेगळा विषय आहे.' ते म्हणाले की,' सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लागणारे ३० लाख रुपये सामान्य लोकांनी दान केले होते. एका ट्रस्टची स्थापन करण्यात आली आणि या सोमनाथ मंदिराच्या कामावर सरकारच्या पैशांपैकी एक पैसाही खर्च करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी सरकारने एक रुपयाही दिला नाही. संपूर्ण खर्च देशातील जनतेने उचलला. यालाच खरा धर्मनिरपेक्षता म्हणतात.'
त्यांनी असाही दावा केला की, 'वल्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर सामान्य नागरिकांनी त्यांच्या स्मारकासाठी निधी गोळा केला पण जेव्हा ही माहिती नेहरूंपर्यंत पोहचली तेव्हा त्यांनी सांगितले की सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे नेते होते. म्हणून हे पैसे गावात विहिरी आणि रस्ते बांधण्यासाठी खर्च केले पाहिजेत. पण ते ढोंग होते. कारण विहिरी आणि रस्ते बांधणे ही सरकारची जबाबदारी आहे. नेहरूजींनी स्वतःला भारतरत्न दिले पण त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतरत्न का देण्यात आला नाही?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर, पीएम मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करून सरदार वल्लभभाई पटेल यांना सन्मानित केले असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.