Siddhi Hande
लहान मुलांना घरी स्नॅक्ससाठी काही न काही खायला लागते. तुम्ही मुलांसाठी घरीच कुरकुरीत मेथी पुरी करु शकतात.
मेथी पुरी बनवण्यासाठी ताजी मेथी, गव्हाचे पीठ, जिरे, ओवा, लाल तिखट, मीठ, तेल आवश्यक आहे.
सर्वात आधी तुम्हाला मेथी बारीक चिरुन घ्यायची आहे.
एका परातीत गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. त्यात चिरलेली मेथी, ओवा, तिखट आणि मीठ टाकून छान मिक्स करा.
या पीठात २-३ चमचे गरम मोहन टाका. यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होती.
या पीठात पाणी टाकून पीठ मळा. पीठ हे घट्ट मळून घ्या.
यानंतर मळलेल्या पीठाची पुरी लाटा. ही पुरी जास्त पातळ लाटू नका.
यानंतर या मोठ्या पुरीचे ग्लासाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने बारीक पुऱ्या पाडून घ्या.
यानंतर तेल गरम करा. तेल एकदम कडकडीत तापले की त्यात एकेक करुन पुरी टाका.
यानंतर तुम्हाला पुऱ्या दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
या पुऱ्या तुम्ही हवाबंद डब्ब्यात ८-१० दिवसांसाठी ठेवू शकतात. संध्याकाळच्या चहासोबत हा बेस्ट ऑप्शन आहे.