shivsena rebel mla  saam tv
महाराष्ट्र

बंडखोर आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध दिले जाते; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप

'बंडखोर आमदारांना जेवनातून गुंगीचे औषध दिले जातं आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

जयेश गावंडे

अकोला : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि तीसहून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आधी सूरत त्यानंतर गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचं लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींवर लागलं आहे. याचदरम्यान, 'बंडखोर आमदारांना जेवनातून गुंगीचे औषध दिले जातं आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. ( Maharashtra political Crisis Latest News In Marathi)

राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत त्यांच्यासोबत ५० आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडमोडींकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा आरोप केला आहे.

' बंडखोर आमदारांना जेवनातून गुंगीचे औषध दिले जातं आहे. एकनाथ शिंदे भाजप विरोधी आहे अन् आज भाजपची प्रशंसा करताहेत, नक्कीचं त्यांना भाजपकडून काहीतरी ट्रीट केलं जात आहे. या मागील कारण शोधणे गरजेचे आहे , असा आरोप मिटकरी यांनी केला आहे. दरम्यान, 'शिवसेनेच्या बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी निधी वाटपावरून लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहे', असे म्हणत मिटकरींनी आरोप फेटाळून लावले आहेत.

शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची माझी पात्रता नाही: अजित पवार

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसोबत बंडाचे निशाण फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं आहे. शिंदे गट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेना नेत्यांनी बंड सुरूच ठेवलं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता, शरद पवार यांनी एखाद्या विषयावर काही वक्तव्य केल्यावर त्यावर बोलायची माझी लायकी नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT