Amol Kolhe  Saam TV
महाराष्ट्र

Amol Kolhe : अमोल कोल्हेंची सप्तधेनु गोमातेसमोर ध्यानधारणा सुरु; पहिल्या फेरीत ६११६ मतांची आघाडी

Amol Kolhe News : कोल्हे सप्तधेनु गोमातेसमोर गाईच्या गोठ्यात ध्यान अवस्थेत बसलेत. अमोल कोल्हेंनी मतदानाच्या दिवशी पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता आणि आज मतमोजणीच्या दिवशीही

Ruchika Jadhav

रोहिदास गाडगे

शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अशात कोल्हे सप्तधेनु गोमातेसमोर गाईच्या गोठ्यात ध्यान अवस्थेत बसलेत. अमोल कोल्हेंनी मतदानाच्या दिवशी पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता आणि आज मतमोजणीच्या दिवशीही पिवळ्या रंगाचाच शर्ट परिधान केला असून गोमातेसमोर ध्यान करत आहेत.

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये शिरूर मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ ठरलाय. या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. कारण येथे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंनी निवडणूक लढवली आहे.

अशात आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार आणि कोण शिरूर लोकसभा मतदारसंघावर आपलं नाव कोरणार याकडे साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे. अशात पहिल्याच फेरीपासून अमोल कोल्हे आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. तसेच आता त्यांनी ध्यानधारणेलाही सुरुवात केली आहे.

पहिल्या फेरीत अमोल कोल्हे यांना ६११६ मतांची आघाडी मिळालीये. तर महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत.

कोल्हे विरुद्ध आढळराव समर्थकांमध्ये फ्लेक्स वॉर

शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये फ्लेक्स वॉर सुरु झालंय. अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून निकालापूर्वीच खासदारकीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लोकसभा निकालाच्या मतमोजणीला सुरुवात होण्याधीच काल शिरूर लोकसभेत अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळरावांचे फ्लेक्स झळकले आहेत. अतिउत्साही कार्यकर्त्यांमध्ये निकालापूर्वीच हा कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

SCROLL FOR NEXT