Amol Kolhe on Govt Decision Onion Saam TV
महाराष्ट्र

Amol Kolhe on Govt Decision Onion: "शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करु नका..."; कांद्यावरुन अमोल कोल्हेंचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

Onion Farmers: शेतकऱ्यांच्या कांद्याला 400 ते 500 रुपये दर मिळत असताना सरकार झोपले होते का असा सवाल देखील शेतकऱ्यांनी केलाय.

साम टिव्ही ब्युरो

Farmer News:

केंद्र सरकार 2410 रुपये दराने महाराष्ट्रातील 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून नाशिक, अहमदनगरमध्ये विशेष खरेदी केंद्र उभारणार येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप केलाय. शेतकऱ्यांच्या कांद्याला 400 ते 500 रुपये दर मिळत असताना सरकार झोपले होते का असा सवाल देखील शेतकऱ्यांनी केलाय. (Latest Onion News)

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीत आज कांदा लिलाव बंद ठेवत व्यापा-यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात असून केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसताहेत.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करु नका कांद्याला हमीभाव द्या. त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही असं म्हणत अमोल कोल्हेंचा आंदोलन स्थळावरुन थेट केंद्र आणि राज्य सरकारला इशारा दिलाय. आता भाव लढवून मिळवावा लागणार असे शेतक-यांना आवाहन करत ३५०० हजार हमीभाव दिला नाही तर पहिलं मुबई नंतर दिल्ली दरबारी कांद्याचा लढा धडकणार असल्याने खासदार कोल्हेंनी जाहिर केलं आहे.

कांदा प्रश्नावर लासलगाव कमिटी मार्केट सभापती बाळासाहेब सिरसागर यांनी म्हटलंय की, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्या प्रकरणी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अवघ्या दहा मिनिटात गुंडाळण्यात आली मात्र या बैठकीतूनही तोडगा निघालेला नाही. भारताच्या विविध ठिकाणी बॉर्डरवर सुमारे 21000 टन कांदा अडकलेला आहे तो विदाऊट ड्युटी सरकारने सोडावा यानंतर आम्ही निर्णय घेणार असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलीये. जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत लिलाव बंद राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

SCROLL FOR NEXT