Union Home Minister Amit Shah during Mumbai visit; his “no crutches” remark sparks unrest among Mahayuti allies. Saam Tv
महाराष्ट्र

Amit Shah: अमित शाहांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ; शिंदेसेना-राष्ट्रवादीत अस्वस्थता

Seat-Sharing Deadlock in Mumbai: मुंबई दौऱ्यात अमित शाह महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्याची अपेक्षा असताना आता शाहांनी मित्रपक्षांचं टेन्शन वाढवलंय...मात्र अमित शाहांनी मित्रपक्षांना काय इशारा दिलाय? आणि त्यावरुन कसं राजकारण तापलंय?

Bharat Mohalkar

ऐकलंत... अमित शाहांच्या याच वक्तव्यामुळे महायुतीतील शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धडधड वाढलीय....कारण आधीच भाजपनं मुंबई महापालिकेत 150 पारचा नारा दिलाय.. यानंतर अस्वस्थ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली.. त्यामुळेच भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरु असलेल्या मुंबई महापालिकेच्या 50 जागांचा तिढा अमित शाह सोडवतील, अशी आशा शिंदेसेनेला होती.. मात्र अमित शाहांनी अप्रत्यक्षपणे शिंदसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सूचक इशाराच दिलाय..

अमित शाहांच्या वक्तव्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. त्यावरुन भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धोका देणार असा टोला काँग्रेसनं लगावलाय.. तर विरोधकांना कुबड्यंाचा अर्थच समजला नसल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केलाय.. खरंतर मुंबई महापालिकेच्या जागा वाटपावरुन महायुतीत वाद पेटलाय... कारण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 50 जागांवर महायुतीत रस्सीखेच सुरुये.... त्याची कारणं काय आहेत?

2017 च्या BMC निवडणुकीत 44 जागांवर शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी भाजपचा पराभव केला होता.. त्यात दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी, घाटकोपर, गोरेगाव भागात कडवी लढत झाली होती..या जागा मिळाव्यात यासाठी शिंदेसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरु आहे

एका बाजूला ठाकरे बंधूंनी एकीचा नारा दिलाय.. त्यामुळे महायुतीतील पक्षांचे धाबे दणाणले आहेत.. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक महायुतीत लढवण्यासाठी चाचपणी सुरु करण्यात आली.. मात्र आधी भाजपनं दिलेला 150 पारचा नारा आणि त्यानंतर आता अमित शाहांनीही मित्रपक्षांना सूचक इशारा दिल्यानं हे दबावतंत्राचं राजकारण आहे की स्वबळाचा नारा? यावर महायुतीचं पालिकेतील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT