Loksabha Election 2024:
Loksabha Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Amit Shah Speech: महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर.. जळगावच्या सभेत अमित शहा कडाडले, घराणेशाहीवरुन शरद पवार, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Amit Shah Jalgaon Sabha Live:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा आहे. या दौऱ्यात अमित शहा यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत विरोधकांवर निशाणा साधला.

काय म्हणाले अमित शहा?

"येणारी लोकसभा ही आत्मनिर्भर भारत बनवण्याची निवडणूक आहे. आपल्यासमोर सगळे परिवारवादी पक्ष आहेत. हे सर्व आपल्या मुलांना पंतप्रधान बनवण्याच्या मागे लागले आहेत. काँग्रेस पार्टीने 70 वर्ष 370 कलम लटकवत ठेवले. मोदीजींनी देशाला समृद्धी बनवण्याचे काम केले," असे अमित शहा यावेळी म्हणाले.

"मी मोदींची गॅरंटी सांगायला आलोय. तिसऱ्या नंबरवर भारताची अर्थव्यवस्था आणणार आहे. नरेंद्र मोदींचे पंचवीस वर्षाचे व्हिजन आहे. मुद्रा लोन दिले आहे. प्रत्येक घरात पाणी पोहोचण्याचे काम केले. काँग्रेसने मतांसाठी 70 वर्ष रामल्लाला टेन्टमध्ये ठेवले. तिसऱ्यांदा मोदीजींना 400 पार करा, असे म्हणत घराणेशाहीला पुढे करणाऱ्या पक्षांना मतदान करणार आहात का?" असा सवाल अमित शहा यांनी विचारला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घराणेशाहीवरुन टीकास्त्र...

या सभेत बोलताना अमित शहा यांनी घराणेशाहीवरुन सोनिया गांधी उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर आहेत. ठाकरेंना आपल्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे. असे म्हणत त्यांना त्यांच्या मुलांना मुख्यमंत्री करायचं हे, तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत," असा हल्लाबोल त्यांनी केला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: पुण्यात CM एकनाथ शिंदेंना धक्का! युवासेनेत मोठी फूट; अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Making Chapati Tips : मऊ लुसलुशीत चपातीसाठी अशी मळा कणीक; दिवसभर पोळ्या राहतील मऊ

Nandurbar Police : दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; निवडणुकीच्या काळात पोलिसांची कारवाई

T20 World Cup 2024: T-20 WC साठी बांगलादेशचा संघ जाहीर! शाकिब अल हसन नव्हे तर या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

Vastu Tips: देव्हाऱ्यात या वस्तू ठेवल्यास आर्थिक संकटातून होईल सुटका

SCROLL FOR NEXT