महाराष्ट्र

Amit Shah in Nanded Visit: अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात आज अमित शहांची तोफ धडाडणार; सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Nanded News Today: नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होत आहे.

Shivani Tichkule

संजय सूर्यवंशी

Amit Shah News: नांदेडच्या होम पीचवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होत आहे. यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय. लोकशाही वर विश्वास ठेवणारे आम्ही आहोत. त्यामुळे या पीच वर खेळण्याचा अधिकार सर्वांचाच आहे. या पीचवर कोणी आले तरी लोक ठरवतात की हे पीच कोणाचे आहे. निवडणुकीमध्ये हे पीच कोणाचं आहे हे लोक ठरवतात. आतापर्यंत आम्ही या पीच वर राहिलो आहोत हा इतिहास आहे. पुढे काय होईल हे लोकांनी ठरवायचं आहे. (Latest Marathi News)

भाजपची (BJP) लोकसभेची सुरुवात नांदेडमधून (Nanded) होत आहे. सर्वांचे नांदेड हे महत्वाचे केंद्र आहे. नांदेड हे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे होम पीच राहिलेलं आहे. त्यामुळे नांदेड मध्ये येऊन सर्वांनीच सुरुवात करावी माझं त्यांना आमंत्रण असणार आहे. अखेर मॅच मध्ये जो जिंकेल तोच अंतिम फेरीत जाईल असे चव्हाण मानले.

राहुल गांधी हे नांदेडमधून गेले

नांदेड मधील काँग्रेसची स्थिती चांगली आहे. ज्या ठिकाणी भाजप विक आहे. त्याठिकाणी भाजप लक्ष केंद्रित करीत आहे हा त्यांचा हेतू असावा. नांदेड नाही तर महाराष्ट्रात त्यांच्या 5 सभा होणार आहेत. स्वाभाविक आहे त्यांचा पक्ष म्हणून ते सभा घेणारच. त्यात गैर काही नाही असे देखील अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

दरम्यान, आज अमित शहा आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यांच्या नांदेड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नांदेड शहरातील अबचलनगर मैदानावर आज भाजपची जाहीर सभा होणार आहे. तर या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये होणाऱ्या आजच्या सभेतून अमित शहा यांच्यासह फडणवीस कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; उसाला प्रतिटन 4200 रुपये दर मिळणार

सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांना शह? 'गोकुळ'नंतर जिल्हा बँकेतही भाजपची तिरकी चालl; माजी खासदाराला गळाला लावण्याचे प्रयत्न

Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...

SCROLL FOR NEXT