amit shah  Saam tv
महाराष्ट्र

Amit Shah Speech : २०१९ साली उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला; शिर्डीतून अमित शहांचा हल्लाबोल

Amit Shah Speech in shirdi : शिर्डीतील महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकारणावर बोट ठेवलं.

Vishal Gangurde

शिर्डी : 'उद्धव ठाकरे हे दगाफटका करत मुख्यमंत्री बनले. २०१९ साली उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. त्यांनी २०१९ साली बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. महाराष्ट्राने शरद पवारांच्या राजकारणालाही जमिनीत गाडलं, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका केली. ते भाजपच्या शिर्डीतील अधिवेशनात बोलत होते.

भाजपच्या शिर्डीतील महाअधिवेशनात भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या सभेत अमित शहा म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले. अनेक आमदार हे मंत्री झाले. खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस पण जिंकली. शरद पवारांनी दगा फटक्याचं राजकारण केलं. लोकांनी त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. लोकांनी त्यांनाही त्यांची जागा दाखवली. स्थिर सत्ता देण्याचं काम लोकांनी केलं आहे'.

'लोकसभेनंतर विधानसभेत जिंकू, असं त्यांचं स्वप्न होतं. पण त्यांचं स्वप्न चक्काचूर झालं. हा आपला महाविजय आहे. या विजयाचं श्रेय हे पक्षातील कार्यकर्त्यांचं आहे. कार्यकर्त्यांनी मनपूर्वक अभिनंदन करतो. या देशात सिद्धांतांचं राजकारण चालणार आहे. कुटुंबशाहीचं राजकारण करणाऱ्यांना लोकांनी नाकारलं आहे. लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांचे आभार मानतो, असे अमित शहा पुढे म्हणाले.

'मी एक चित्र पाहिलं. त्यात शरद पवारांच्या फोटो मागे एक चित्र होते. त्यात अनेक प्रदेशातील चित्र होते. आता उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईतही महायुतीने मोठी बाजी मारली. उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याचं काम केलं. महाराष्ट्रातील लोकांनी हिंदू आणि सनातन विचारांना मानतो, असं सिद्ध केलं. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. या वर्षात हरियाणामध्ये तिसऱ्यांदा जिंकलो. आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचा विजय झाला. ओरिसामध्येही बहुमताचं सरकार स्थापन झालं. सिक्कीममध्येही आम्ही जिंकलो. महाराष्ट्रातही आम्ही जिंकलो. भाजपचा इतिहास लिहिला जाईल. त्यावेळी २०२४ वर्ष महत्वाचं ठरलं, असे अमित शहा यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

Maharashtra Live News Update : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

SCROLL FOR NEXT