Cm Eknath Shinde News Twitter
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'राज्यात महायुतीचेच सरकार आणू..' CM शिंदेंची ग्वाही, अमित शहांकडे केली मोठी विनंती; बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर

Amit Shah CM Eknath Shinde Meeting: लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप करायला आणि उमेदवारांची नावे घोषित करायला उशीर करायला नको, जागावाटप लवकरच जाहीर करायला हवं अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना केली.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर, मुंबई|ता. २ ऑक्टोबर

Mahayuti Meeting News: आगामी विधानसभा निवडणुकांची रणनिती, महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तसेच घटक पक्षांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कंबर कसली आहे. दोन दिवसांपासून अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी भाजप नेते तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्यांनी बैठकही घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये महायुतीचे सरकार आणू, अशी ग्वाही अमित शहांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात महायुतीतेच सरकार: CM शिंदे

काल रात्री उशिरा सह्याद्री अतिथी गृहामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यात महायुतीचंच सरकार आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप करायला आणि उमेदवारांची नावे घोषित करायला उशीर करायला नको, जागावाटप लवकरच जाहीर करायला हवं अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना केली.

जागा वाटपावरुन केली मोठी विनंती..

तसेच एकनाथ शिंदे यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या जागा आणि त्या जागा का हवे आहेत याबाबत सविस्तर माहिती अमित शहा यांना दिली. शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजना आणि इतर योजना या लोकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचले आहेत यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितल्याचेही समोर आलं आहे.

अमित शहांचा महायुतीच्या नेत्यांना सल्ला!

दरम्यान, जागावाटपाच्या विषयावर सर्व समन्वयांना मार्ग काढू अशी ग्वाही अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली. तसेच महायुतीमध्ये विसंवाद आहे अशी भावना लोकांसमोर येऊन देऊ नका, आपापसातील मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे महायुती म्हणून एकत्र या आणि एकत्र लढा, असा सल्लाही अमित शहा यांनी यावेळी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT