CM Devendra Fadnavis News  Saam tv
महाराष्ट्र

India-Pakistan Conflict : मुंबईत तातडीची बैठक, राज्य सरकार-संरक्षण दलात अत्यंत महत्वाची चर्चा, नेमकं काय घडलं?

CM Fadnavis Meeting: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पार पडली.

Bhagyashree Kamble

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती चिघळल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करत दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्याची घोषणा केली. तरीही संपूर्णपणे तणाव अद्याप निवळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध महत्त्वाच्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय लष्कराकडून लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा आणि कर्नल संदीप सील, नौदलाकडून रिअर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी आणि कमांडर नितेश गर्ग, तर वायुदलाकडून एअर वाइस मार्शल रजत मोहन उपस्थित होते. याशिवाय आरबीआय, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस, होमगार्ड आदी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले.

बैठकीत नेमकं घडलं?

या बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक उपयोग, सायबर सुरक्षा आणि खबरदारीचे उपाय यासंबंधीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारकडून संरक्षण दलांना आवश्यक सहकार्य आणि जलदगतीने समन्वय यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

भारतीय लष्कराचे विशेष कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ऑपरेशन सिंदुरचा विशेष उल्लेख करत भारतीय लष्कराचे कौतुक केले. ते म्हणाले, “भारतीय सैन्याने ज्या अचूकतेने ऑपरेशन सिंदुर पार पाडले, ते कौतुकास्पद आहे. मी त्यांना सलाम करतो. मुंबई ही देशाची राजधानी आहे. तिची सुरक्षा ही प्राधान्याची बाब आहे. यापूर्वी मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमुळे शत्रूंनी भारताच्या आर्थिक शक्तीवरच आघात करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भविष्यात अधिक सजग आणि एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे.” असं मुख्यमंत्री म्हणाले.

सायबर सुरक्षेबाबत विशेष खबरदारी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सायबर सुरक्षेबाबतही विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलातील अधिकारी यांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, नागरी सुरक्षेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त महानिरीक्षक शिरीष जैन, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी तसेच मुंबई व उपनगर जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT