Nagpur News  Saam Digital
महाराष्ट्र

Nagpur Crime News : महिलेने पतीचा मृतदेह ॲम्बुलन्सने गावी नेला; मागे चालकाचं लेकाच्या मदतीने संतापजनक कृत्य, पोलीसही हादरले

Crime News : पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा छडा लावला असून बाप-लेकाला अटक केली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News :

नागपुरात मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा असंवेदनशील प्रकार उघडकीस आला आहे. अत्यंत संतापजनक कृत्य एका अॅम्बुलन्स चालकाने एका कुटुंबियांसोबत केला आहे.

आजारपणामुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला होता. रुग्णवाहिकेतून मृतदेह मूळ गावी नेण्यात आला. मात्र जिथे संवेदना संपतात तिथे काय बोलावं असंच काहीसं घडलं. शवावाहिका चालकाने घरात कुणीच नसल्याची संधी साधत मृतदेह घेऊन गेला आणि स्वतःच्या मुलाला त्या घरात चोरी करण्यासाठी सांगितलं. पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा छडा लावला असून बाप-लेकाला अटक केली आहे. (Crime News)

नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या कल्पना घोडे यांच्या पतीवर उपचार सुरू असताना 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील गावात जाऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी अॅम्बुलन्स मागवली. अॅम्बुलन्स चालक अश्वजीत वानखडे मृतदेह घेऊन रवाना झाला. (Latest Marathi News)

घोडे यांच्या घरात कोणीच नसल्याची कल्पना त्याला होती. अश्वजीतने मुलगा नितेशला चोरी करण्याची टीप दिली. नितेशने अल्पवयीन साथीदारांना घेऊन घरात चोरी करत सोन्याचे दागिने आणि रोख लंपास केली. कल्पना घोडे यांना चोरी झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये तीन जण मोपेडवर येऊन चोरी करून गेल्याचं समोर आलं. सक्करदरा पोलिसांनी तात्काळ त्या मुलांच्या वर्णनावरून इमामवाडा हद्दीतून नितेश वानखडेला अटक केली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी बाप-लेकाला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. तसेच त्यांच्याकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमालाही हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिलच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी? कोचने सांगितलं 'या' खेळाडूचं नाव

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढणार? वाचा सविस्तर

Vivek Oberoi: 'कोण शाहरुख खान...? त्याला सगळे विसरतील'; किंग खानबद्दल असं का बोलला विवेक ओबेरॉय

Aloo Kachori : आलू कचोरी बनवण्यासाठीच्या या भन्नाट ५ टिप्स, नक्की करा फॉलो

Mumbai Crime: 'ते' फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी, बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

SCROLL FOR NEXT