अजय दुधाणे
Ambernath : अंबरनाथ शहराला लवकरच 'टेम्पल सिटी' अशी नवी ओळख मिळणार आहे. यामध्ये शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांचं अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराला साजेसं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. (Latest Ambernath News)
अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिराच्या रूपाने तब्बल १०६० वर्ष जुना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या मंदिराच्या परिसराचा विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून याच अंतर्गत टेम्पल सिटी अशी शहराची ओळख निर्माण केली जाणार आहे. यामध्ये शहरातील प्रमुख चौक, रस्ते यांवर एकच टेम्पल थीम वापरून सुशोभीकरण केलं जाणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठीची निविदाही अंबरनाथ पालिकेनं प्रसिद्ध केली आहे.
अंबरनाथ शहरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नाट्यगृह, प्रशासकीय इमारत, शूटिंग रेंज, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, काँक्रिट रस्ते अशी विकासाची अनेक मोठी कामं झाली आहेत. यानंतर आता सुशोभीकरणाच्या माध्यमातून शहराला नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला जातोय. अंबरनाथचे शिवमंदिर हे प्राचीनकाळापासूनचे आहे. अशात आता मंदिराचे सुशोभीकरण झाल्यास येथील पर्यटक देखील वाढतील. तसेच याचा फयदा तेथील स्थानिक व्यवसायीकांना देखील होऊ शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.