Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : अंबरनाथमध्ये उबाठाचे उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप; अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांची तक्रार

Ambarnath News : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी २०१४ साली सुद्धा अंबरनाथ विधानसभेतून निवडणूक लढवली होती.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी अर्ज दाखल केल्यासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्टॅम्प पेपरवर तक्रारही केली आहे. या आरोपावर वानखेडे यांनी प्रतिउत्तर देखील दिले आहे. 

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी २०१४ साली सुद्धा अंबरनाथ विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि यंदाच्या निवडणुकीत सादर केलेलं प्रतिज्ञापत्र यात तफावत असून (Ambarnath News) एक व्यावसायिक गाळा, बँकेची खाती, सोनं, व्यावसायिक पॅन कार्ड अशी माहिती वानखेडे यांनी लपवल्याचा आरोप सुनील अहिरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. 

दरम्यान याबाबत राजेश वानखेडे यांना विचारलं असता, मी कोणतीही माहिती लपवलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अहिरे यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. निव्वळ मीडियासमोर येण्यासाठी केलेला हा खटाटोप असल्याचा टोलाही त्यांनी अहिरे यांना लगावला आहे. दरम्यान अहिरे यांच्या तक्रारीवर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT