Ambarnath News
Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News: चुकीच्या पद्धतीने भूसंपादन केल्याने शेतकरी आक्रमक; अंबरनाथमध्ये अर्धा राज्य महामार्ग केला बंद

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शेतकऱ्यांनी डोंबिवल– बदलापूर पाईपलाईन रोड या राज्य महामार्गाची (Amabarnath) एक मार्गिका बंद केली आहे. १९७२ साली झालेल्या भूसंपादनात एमआयडीसीने एक जागा संपादित केल्याचे दाखवून दुसऱ्याच जागेवर रस्ता आणि पाईपलाईन टाकली. त्यामुळं दोन्ही जागा मागील ५० वर्षांपासून अडकून पडल्याचे सांगत (Farmer) शेतकरी आक्रमक झाले आहेत. (Tajya Batmya)

निव्वळ कागदी चूक सुधारण्यासाठी एमआयडीसीने मागील ५० वर्षात स्वारस्य दाखवले नाही; असा आरोप करत शेतकऱ्यांनी या राज्य महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही एमआयडीसीकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर आज वसार गावातील शेतकऱ्यांनी डोंबिवली-बदलापूर राज्य महामार्गाची एक मार्गिका बंद केली.

दरम्यान, शेतकऱ्यांकडून हा रस्ता बंद केला जात असताना या ठिकाणी एमआयडीसी अधिकारी आणि पोलिसही उपस्थित होते. याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारलं असता आम्ही या प्रश्नाबाबत आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवले असून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल; अशी प्रतिक्रिया उपअभियंता विजय शेलार यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

Nawazuddin Siddiqui Net Worth : एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा नवाज आज आहे कोट्यवधींचा मालक

Chhagan Bhujabal News | मविआचा 35 जागांचा दावा भुजबळांनी असा खोडून काढला..

Delhi Metro: पुन्हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल; लेडीज कोचमध्ये मुलीचा अश्लील डान्स Watch video

Shakuntala Railways | अबब! चोरट्यांनी थेट रेल्वे ट्रॅकच पळवला!

SCROLL FOR NEXT