Ambarnath Crime Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Crime : जमिनीच्या वादातून इस्टेट एजंटची हत्या; अंबरनाथमधील घटनेचा काही तासातच उलगडा!

Ambarnath News : जमीन मूळ मालकाने पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विकली होती. यावरून संजय पाटील यांचे जमीन मालकाशी वाद सुरू होते

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका इस्टेट एजंटची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासातच उलघडा करत दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

जुन्या अंबरनाथ गावात राहणारे संजय पाटील यांनी १९ वर्षांपूर्वी अंबरनाथ एमआयडीसीत जमीन खरेदी केली होती. मात्र ही जमीन मूळ मालकाने पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विकली होती. यावरून संजय पाटील यांचे जमीन मालकाशी वाद सुरू होते. दरम्यान मंगळवारी रात्री संजय पाटील हे मेफ्लॉवर गार्डन समोर उभे असताना मागून आलेल्या सुरज पाटील आणि हर्ष पाटील या दोघांनी अचानकपणे त्यांच्यावर धारदार शस्त्राने तब्बल २५ वार केले. यातील दोन घाव वर्मी बसल्याने संजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

गुन्हा केला कबूल   

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरु केला. यानंतर पोलीस तपासात अवघ्या काही तासातच सुरज पाटील आणि हर्ष पाटील या दोघांना भिवंडीतून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या चौकशीत जमिनीच्या वादातून आपणच ही हत्या केल्याची दोघांनी कबुली दिली. त्यानुसार दोघांना पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

SCROLL FOR NEXT