Ambarnath Crime Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Crime : अंबरनाथ हादरले..१५ वर्षीय मुलीवर रिक्षा चालकाकडून अत्याचार

Ambarnath News : अंबरनाथमध्ये वास्तव्यास असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी हि अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना रिक्षा चालकाने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं

अजय दुधाणे

अंबरनाथ : राज्यात बदलापूर येथील घटनेचे अद्याप पडसाद उमटत असून अत्याचाराच्या घटनेने अंबरनाथ हादरले आहे. एका रिक्षा चालकाने मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने नेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रिक्षा चालकास बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथमध्ये (Ambarnath) वास्तव्यास असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी हि अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना रिक्षा चालकाने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं. त्यानंतर तिला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर नेत तिच्यावर अत्याचार केला. (Crime News) घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिवाजीनगर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. 

याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रिक्षा चालकालाही बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. मात्र अत्याचाराच्या या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्ड्रिंक प्यायल्याने ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली; निरखून पाहिलं तर आढळला कचरा, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्रकरणी सर्वात मोठी कारवाई,DGCA ची व्हीएसआरच्या विमान उड्डाणावर बंदी

Wednesday Horoscope : मनासारखा दिवस जाईल, डोके शांत ठेवून काम कराल; ५ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार

Digital Arrest: फोन आला, कोणी व्हिडिओ कॉल केला तर काय कराल? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला बचावाचा मार्ग

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

SCROLL FOR NEXT