Solar Pump Scam : कुसुम सौर ऊर्जा पंप योजनेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; लाभार्थ्यांचे पंप परस्पर विक्री, आष्टीत सबएजटांचा कारनामा

Beed News : कुसुम सौर योजना हा भारत सरकारचा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असताना या प्रकल्पात कंपन्यांनी नेमलेले सब एजंट आणि त्यांचे सहाय्यक यांनी या योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे.
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : पीएम कुसुम सौर ऊर्जा पंप योजनेमध्ये मंजूर झालेला पंप लाभार्थी शेतकऱ्याला न देता दुसऱ्याला विकण्याचा प्रकार बीडच्या आष्टीमध्ये उघडकीस आला आहे. हा घोटाळा मोठ्या प्रमाणात करण्यात आला असून योजनेतील सबएजटांनी हा कारनामा केला असून घोटाळेबाजावर कारवाई करण्यासाठी माजी मंत्री सुरेश धस यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला आहे.

शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम कुसुम सौर ऊर्जा पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड केली जात असते. मात्र बी जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात निवडण्यात आलेले लाभार्थी राजेंद्र गोंदकर यांना सोलर पंप मिळाला नसून त्यांचा पंप दुसरीला विकण्यात आला होता. याबाबत आष्टी पोलीस स्टेशन येथे रीतसर फिर्याद दाखल केली आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने व शेतकऱ्यांची (Beed) फसवणूक होत असल्याने या प्रकरणात माजी मंत्री सुरेश धस यांनी या प्रकरणात संबंधित कंपनी आणि एजंटवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आष्टी पोलीस ठाण्यात ठीया केला. 

Beed News
Ahmednagar News : रुग्णालयाचा लॉगिन वापरून बनविले खोटे दिव्यांग प्रमाणपत्र; चार जणांवर गुन्हा दाखल

कुसुम सौर योजना हा भारत सरकारचा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असताना या प्रकल्पात कंपन्यांनी नेमलेले सब एजंट आणि त्यांचे सहाय्यक यांनी या योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. काही लाभार्थ्यांच्या नावे मंजूर झालेले पंप रोख पैसे घेऊन दुसऱ्या शेतकऱ्यांना विकले आहे. या सर्व प्रकरणाची आणि आर्थिक घोटाळ्यातील सहभागी असणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी पोलीस स्टेशन आष्टी येथे जाऊन केली आहे. दरम्यान कारवाई करण्याची लेखी आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर ठिय्या मागे घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com