Ambarnath Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Crime News: चित्रिकरण केल्याचा राग! गुन्हेगाराने पत्रकाराला मारला दगड; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांंसमोरच धक्कादायक प्रकार

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

अजय दुधाणे

Ambarnath Crime News: गुन्हेगाराला जेलमध्ये नेत असताना चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना गुन्हेगाराने दगड मारत शिवीगाळ केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोरच हा प्रकार घडला असून यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथच्या (Ambarnath शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडवाडीत राहणाऱ्या जितेंद्र उर्फ टायगर पवार याच्यावर मागील काही काळात ५ गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत १ वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

यानंतर आज त्याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात रवाना करण्यात आले. यासाठी त्याला शिवाजीनगर (Shivajinagar) पोलीस ठाण्यातून बाहेर आणून गाडीत बसवत येत असताना काही स्थानिक पत्रकार तिथे चित्रीकरण करत होते.

या पत्रकारांना पाहून जितेंद्र पवार हा संतापला आणि त्याने पत्रकाराच्या दिशेने दगड फेकून मारत शिवीगाळ केली. तसंच फक्त १ वर्षासाठी आत मध्ये चाललो आहे, असं म्हणत पत्रकारांना धमकी देखील दिली. त्याने भिरकावलेला दगड हा एका महिला पत्रकाराच्या पायाला चाटून गेला.

धक्कादायक बाब म्हणजे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या समोरच हा प्रकार घडला. दरम्यान, आरोपीला पोलीस ठाण्यातून बाहेर आणत असताना त्याच्या हातात दगड नेमका कोणी दिला? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: ६ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: Mumbai: कांदिवलीत ऑइलमुळे १४ दुचाकींचे अपघात; अनेक जण जखमी!

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

SCROLL FOR NEXT