Ambadas Danve announced as MVA candidate after Uddhav Thackeray steps aside from Legislative Council race. साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी डाव टाकला, पण काँग्रेस ट्विस्ट आणणार; सपकाळ थेट दिल्लीत पोहचले, उमेदवार उतरवणार का?

Uddhav Thackeray latest news : शिवसेना (UBT) कडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

शिवसेनेकडून (UBT) अंबादास दानवे विधान परिषदेसाठी अधिकृत उमेदवार असतील, अशी घोषणा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण आता ठाकरेंच्या या निर्णयावर काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे राजकीय नजरा खिळल्या आहेत. कारण उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेवर जावे, तरच आम्ही पाठिंबा देऊ, असे काँग्रेसने स्पष्ट केले होते. यावर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रतिक्रिया समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसही उमेदवार देणार असल्याचे समोर आले आहे. सपकाळ राजधानी दिल्लीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी गेले आहेत. तिथे ते वरिष्ठांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेणार आहेत.

मविआत फूट?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे म्हणाले की, "शिवसेनेकडून अंबादास दानवे यांची घोषणा केली असेल, तर आम्ही पाठिंबा देऊ. पण त्याआधी आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती. यावर आम्ही बैठक घेऊन चर्चा करू." दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घ्यावी अशी आमची भूमिका होती. मात्र, आता त्यांनी दानवेंबाबत निर्णय घेतला आहे. याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा झाली असेल. निवडणुकीला सामोरे कसे जायचे? हे आम्ही ठरवू, असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

काँग्रेस काय भूमिका घेणार?

अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवर काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे मविआच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. कारण, हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत 'मातोश्री'वर जाऊन उमेदवारीबाबत चर्चा केली होती. त्याशिवाय सुप्रिया सुळे यांनीही ठाकरेंनीच विधान परिषदेवर जावे, असे म्हटले होते. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू सहकारी अंबादास दानवे यांना संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका नेमकी काय असेल? काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार देऊन नवा 'ट्विस्ट' निर्माण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अंबादास दानवे काय म्हणाले?

"मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपा असे सर्व पक्ष सोबत आहेत. मी सर्वांचा मिळून उमेदवार आहे," अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी स्वतः सभागृहात जावे अशी सर्वांची इच्छा होती. पण त्यांनी सामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे." काँग्रेस पाठिंबा देणार का? असा प्रश्न विचारला असता, "तुम्ही याबाबत काँग्रेसच्या नेत्यांशी बोला," असे त्यांनी स्पष्ट केले.

"अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या (३० एप्रिल) सकाळी ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे."
संजय राऊत, खासदार शिवसेना (ठाकरे गट)

विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम:

  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)

  • उमेदवारी अर्जांची छाननी: २ मे, २०२६ (शनिवार)

  • अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस: ४ मे, २०२६ (सोमवार)

  • मतदानाची तारीख: १२ मे, २०२६ (मंगळवार)

  • मतदानाची वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० पर्यंत

  • निकाल (मतमोजणी): १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ५:०० वाजता

  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख: १३ मे, २०२६ (बुधवार)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

sugarcane juice: ऊसाचा रस प्यायल्याने रक्तातील शूगर वाढते का?

20 हजार कोटींची ‘ट्युशन फॅक्टरी’; कोचिंगचा गोरखधंदा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Petrol-Diesel Rate Rise: आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ; शेतकरी आणि सामान्यांच्या संतापाचा उद्रेक

7 वर्षांपासून सुरू NEET पेपर चोरी? मोटेगावकरसाठी कुलकर्णी फोडायचा पेपर?

खेळता-खेळता लिफ्टमध्ये गेला अन् दोन मजल्यांमध्ये अडकला; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT