श्रावणात निरोगी राहण्यासाठी प्या हे 4 हेल्दी ड्रिंक्स; महिनाभर राहाल फिट

Manasvi Choudhary

श्रावण

श्रावण महिना म्हणजे हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात सण-उत्सवांचा आणि उपवासांचा काळ असतो यासाठी शरीर फिट असणे महत्वाचे आहे.

Shravan | google

शरीराची रोगप्रतिकारशक्ती राहते मजबूत

शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी तुम्ही दररोज 4 हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करणे महत्वाचे आहे.

Strong immunity | yandex

लिंबू पाणी

लिंबू पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. लिंबामधील व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.

Lemon water | pinterest

आलं- मध पाणी

आलं औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाते. आलं पाणी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते. आलं पाण्यात तुम्ही मध टाकून प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. एक ग्लास गरम पाण्यात आल्याचे तुकडे घालून ते थोडे उकळून घ्या. पाणी थोडे कोमट झाल्यावर ते गाळून प्या.

Ginger water

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे फ्री रॅडिकल्समुळे होण्यापासून शरीराचे रक्षण करतात. शरीराची पचनक्रिया सुधरवतात. गरम पाण्यात ग्रीन टी बॅग किंवा पाने घालून २-३ मिनिटे भिजू द्या. हवं असल्यास त्यात थोडं लिंबू किंवा पुदिन्याची पाने टाकू शकता.

Green Tea

फळांचा रस

ताज्या फळांचा रस करून प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. डब्बाबंद किंवा बाहेरचे पॅक्ड ज्यूस पिण्याऐवजी घरीच संत्री, डाळिंब किंवा मोसंबीचा ताजा रस काढून लगेच प्यावा.

Fruit Juice | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Benefits Of Reading | Canva

next: रात्री बेडरूमचा दरवाजा बंद करावा की उघडा ठेवावा?

Bedroom Door Open Or Closed While Sleeping At Night
येथे क्लिक करा..