amaravati news  Saam tv
महाराष्ट्र

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

amaravati news : अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय. अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याचे समोर आलेय.

Saam Tv

जिल्हा रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा वावर

रुग्णालयाच्या अपघात कक्षासारख्या संवेदनशील विभागात निष्काळजीपणा

रुग्णांच्या सुरक्षिततेवर आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावीत शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा मुक्तपणे वावर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थेवरही टीका होऊ लागली आहे.

अमरावतीतील जिल्हा रुग्णालयातील अपघात कक्ष २४ तास कार्यरत असतो. या कक्षेत अपघातग्रस्त, गंभीर अवस्थेतील रुग्ण, विषप्राशन केलेले रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मात्र अशा संवेदनशील विभागातच कुत्रे बेधडक फिरताना दिसताहेत. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

काही रुग्णांवर उपचार सुरू असतानाच एक भटका कुत्रा बेडजवळ फिरतानाचा व्हिडिओ समोर आला. भटक्या कुत्र्यांमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालीये. जखमी रुग्णांसाठी अशा अस्वच्छ वातावरणामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नियंत्रण नसल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही गंभीर त्रुटी आहेत.

या प्रकाराची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अपघात कक्षासह संपूर्ण रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करणे आणि भटक्या प्राण्यांचा प्रवेश रोखणे अत्यावश्यक असल्याचे बोलले जात आहे.

अमरावतीत ही घटना कुठे घडली?

अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अपघात कक्षात ही घटना घडली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT