Amaravati News
Amaravati News Saam tv
महाराष्ट्र

Amaravati News: मांत्रिकांच्या माध्यमातूनच बालमृत्यू व माता मृत्यू कमी होईल; आरोग्य विभागाचा दावा

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यू व मातामृत्यू अशा अनेक आरोग्याच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून कायम आहेत. अशिक्षित असलेले अधिक आदिवासी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत नाही. आता बालमृत्‍यू व माता मृत्‍यू हे मांत्रिकांच्‍या मदतीनेच कमी होणार आहे. असा दावा करत आरोग्‍य विभाग मांत्रिकांची मदत घेत आहे. (Breaking Marathi News)

मेळघाटातील ६०० च्यावर मांत्रिकांना आजपासून गोळा करून मांत्रिकांना आरोग्य विभाग प्रशिक्षण देणार आहे. त्यांना मानधन म्हणून १०० रुपये देखील देणार आहे. आदिवासी बांधवांनी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावा. यासाठी आता मांत्रिकच (भूमका) प्रशासनाला मदत करणार आहे. त्यासाठी प्रशासन मांत्रिकाच्या दारी पोहोचले. त्या मांत्रिकाने रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यासाठी पुढाकार घ्यावा; असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्‍य यंत्रणा अपयशी का?

तर भूमिकाच्या माध्यमातून मेळघाटातील बालमृत्यू, माता मृत्यू व आरोग्याच्या समस्या निकाली काढण्यात काही प्रमाणात यश मिळेल असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून आरोग्य यंत्रणा ही अपयश का आलं. कारण त्यांना मांत्रिकाची मदत घ्यावी लागते हा चिंतेचा विषय आहे. भूमिकाला प्रशिक्षण देणाऱ्या निर्णयाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरीश केदार यांनी स्वागत केले. पण इतकी वर्षे होईनही आरोग्य यंत्रणा का अपयशी ठरली? हा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT