Dhule News: धुळ्यात आढळून आला H3N2 चा रुग्ण; शिक्षणासाठी आलेली विद्यार्थीनी बाधित

धुळ्यात आढळून आला H3N2 चा रुग्ण; शिक्षणासाठी आलेली विद्यार्थीनी बाधित
Dhule News H3N2
Dhule News H3N2Saam tv

धुळे : धुळ्यात H3N2 चा रुग्ण आढळून आला आहे. धुळ्यात बाहेर गावाहून शिकण्यासाठी आलेली विद्यार्थिनी H3N2 बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे (Dhule News) धुळ्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. (Tajya Batmya)

Dhule News H3N2
Latur News: आई करते मजुरी, पितृछत्र हरपलेले; जिद्दी पृथ्‍वीराज इस्रो सहलीला

धुळ्यात शिक्षणासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थिनीसह तिचे आणखी मित्र-मैत्रिणी हे बाहेर राज्यात फिरण्यासाठी गेले होते. दरम्‍यान ते धुळ्यात परतल्यानंतर या विद्यार्थिनी त्रास जाणवू लागला. यानंतर तिने खाजगी रुग्णालयामध्ये तपासणी केली असता तिचा H3N2 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्र-मैत्रिणीना देखील खाजगी रुग्णालयात कॉरंटाईन करण्यात आले आहे.

Dhule News H3N2
Jalgaon Accident News: वडिलांचे श्राद्ध घालण्यापूर्वीच वकील मुलाला मृत्‍यूने गाठले; शहरातील रस्‍त्‍यावर कंटेनरने चिरडले

अहवाल येणे बाकी

सदरच्‍या सर्वांची देखील या संदर्भातील तपासणी करण्यात आली असून अद्याप त्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. H3N2 ने बाधित असलेल्या विद्यार्थिनीवर शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com