Jalgaon Accident News: वडिलांचे श्राद्ध घालण्यापूर्वीच वकील मुलाला मृत्‍यूने गाठले; शहरातील रस्‍त्‍यावर कंटेनरने चिरडले

वडिलांचे श्राद्ध घालण्यापूर्वीच मृत्‍यूने गाठले; शहरातील रस्‍त्‍यावर कंटेनरने चिरडले, जळगावमधील घटना
Jalgaon Accident News
Jalgaon Accident NewsSaam tv
Published On

जळगाव : शहरातील नेहरू चौकात सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास कंटेनरने दुचाकीस्वार वकिलास (Jalgaon News) चिरडले. ॲड. योगेश जालमसिंग पाटील (वय ४५, रा. दादावाडी) असे मृत वकिलाचे नाव आहे. गेल्या पाच दिवसांत दुसऱ्या वकिलाचा (Accident) अपघाती मृत्यू झाला. (Live Marathi News)

Jalgaon Accident News
Sharad Pawar On Savarkar Dispute: सावरकर वादात शरद पवारांची मध्यस्थी, राहुल गांधी यापुढे सावरकरांचा मुद्दा टाळणार?

तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील मुळ रहिवासी ॲड. योगेश पाटील (वय ४५) सायंकाळी नेहरू चौकातून वळण घेत होते. या दरम्‍यान कंटेनर चालकाने वकिलांच्या दुचाकीला धडक दिली. यात ॲड. योगेश पाटील दुचाकीसह पुढील चाकाखाली चिरडले गेले. तत्काळ प्रत्यक्षदर्शींसह नगरसेवक प्रशांत नाईक यांनी ॲड. योगेश यांना उचलले. त्यांना छाती, पायाला अन्‌ डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना जिल्‍हा रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले. तेथे काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Jalgaon Accident News
Devendra Fadnavis Threat : देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब! धमकीच्या कॉलनंतर पोलिसांची धावपळ

ते बेालता बोलाच शांत

अपघातानंतर ॲड. योगेश पाटील यांना उचलणाऱ्यांना त्यांनी थॅक्सही म्हटले. बऱ्यापैकी ते बोलत असल्याने किरकोळ दुखापत झाली असावी, असा समज झाला. मात्र, त्यांना त्रास जाणवू लागल्याने तातडीने त्यांना जिल्‍हा रुग्णालयात नेले. इर्मजन्सी वॉर्डात बोलता- बोलता ॲड. योगेश पाटील शांत झाले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Jalgaon Accident News
Latur News: आई करते मजुरी, पितृछत्र हरपलेले; जिद्दी पृथ्‍वीराज इस्रो सहलीला

आज वडिलांचे श्राद्ध

ॲड. योगेश पाटील यांच्या वडिलांचे आज श्राद्ध असल्याने त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी तमगव्हाणला गेले आहेत. न्यायालयाचे काम आटोपून ॲड. योगेश पाटीलही गावी जाणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. ॲड. योगेश पाटील यांच्या नावाचे साधर्म्य असलेले त्यांचे चुलत मावसभाऊ ॲड. योगेश पाटील यांना त्यांच्या मित्रांकडून भ्रमणध्वनीवरून ‘तुमचा अपघात झाला का’, अशा विचारणा होवू लागली. अवघ्या तासाभरापूर्वी आम्ही दोघे सेाबत होते. ते माझ्याशी बोलून गेले अन्‌ अपघाताची घटना घडल्याचे ॲड. योगेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com