Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : आगामी निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा डाव, निलंबित नेत्याची घरवापसी; ताकद वाढली

Maharashtra Political News : अमरावती जिल्ह्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी झाली आहे. बंडखोरी केल्याने पक्षाने त्यांना निलंबित केले होते.

Yash Shirke

  • भाजपाचे अमरावतीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी

  • भाजप विरोधात बंडखोरी केल्याने भाजपाने केले होतं तुषार भारतीय यांचे निलंबन

  • मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : राज्यातील सर्व पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मोर्चेबांधणी दरम्यान विविध पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीपूर्वी अमरावती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती महानगरपालिकेचे सभागृह नेते, भारतीय जनता पार्टीचे अमरावतीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. त्यांनी भाजप विरोधात बंडखोरी केली होती. या कृतीमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता निलंबन रद्द करुन त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात तुषार भारतीय यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाच्या रवी राणा यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. यामुळे तुषार भारतीय यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यांच्या प्रवेशामुळे अमरावतीत भाजपची ताकद पुन्हा वाढल्याची म्हटले जात आहे.

मुंबईत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तुषार भारतीय यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. पक्षाने त्यांच्यावरील निलंबन रद्द केले आहे. तुषार भारतीय हे भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू आहेत. त्यांचे पुन्हा भाजपमध्ये परतणे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

Thane To Buldhana Travel: ठाण्यावरुन बुलढाण्याला प्रवास कसा करायचा? रेल्वे, खाजगी बस आणि टॅक्सी जाणून घ्या सर्व मार्ग

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

SCROLL FOR NEXT